Maidi,Madhya Pradesh: Computer Training Course and School Books Distribution on 12/05/2017

Recent Updates : 12/05/2017 and 13/05/2017 “अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाज्नशलाकया।चक्षुरुन्मीलितं येन् तस्मै श्री गुरवे नमः।।”
गुरु म्हणजे अज्ञान दुर करुन,ज्ञानाचा प्रकाश पसरवुन त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणारे.
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा आशिर्वादाने व परमपुज्य आदरणीय श्री अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली “संगणक प्रशिक्षण”( Computer training cource) या विषयाचे पाच दिवसाचे वर्ग मेहंदी मुक्कामी,ता.सौंसर ,जि.छिंदवाडा,मध्य प्रदेश येथे घेण्यात आले.
प्राथमिक तयारी म्हणून नोंदणी अर्ज ( Ragistration forms )भरुन घेण्यात आलेत.या कामात श्री प्रशांत उरमाले,ग्रामपंचायत सदस्य यांनी मदत केली.हे वर्ग सोमवार दिनांक ८ मे २०१७ पासुन सुरु करण्यात आले.रोज गुरु स्तवन व सरस्वती मंत्राने वर्गाची सुरुवात व्हायची .
या वर्गामध्ये मागच्या वर्षीचे बेसीक कॕम्पुटर कोर्सचे प्रशिक्षित विद्यार्थीही होते.यावेळेस त्यांना विस्तारपुर्वक M S Word व कॕशलेस आॕनलाईन ट्रांझाक्शन शिकविण्यात आले. हे शिकण्यासाठी सर्व मुले खुप उत्सुक होती. या वर्गातील काही विद्यार्थ्यांची नावे…
१)रोशन उरमाले Bsc 2nd yr
२)आशीष उरमाले ITI 2nd yr
३)गौरव उरमाले 11th
४)प्रणय उरमाले 9th
५)अजित उरमाले 11th
६)रोशन राजुरकर ITI 2nd yr
७)कुणाल राजुरकर 11th
८)मयुर उरमाले 10th
९)चेतन खरात 8th
१०)ऋषभ काकडे 8th
११)अभिषेक काकडे 11th
१२)पंकज खरात 11th
मेहंदी या गावात तर उत्स्फुर्त प्रतिसाद तर होताच पण आजुबाजुच्या गावातील मुला मुलीं मध्ये संकोच होता.तो आम्ही त्यांच्या गावात संवाद साधुन घालविला. या गोष्टींचा परिणाम परत १२ मुले व मुली या वर्गात येऊ लागल्यात.
१)दत्तू देठे 12th
२)संदेश पातुरकर 10th
३)पवन वडस्कर 10th
४)अमोल ITI
५)पल्लवी Bsc 2nd yr
६)अमृता 12 th
७)प्रतिक्षा 8th
८)पारुल 4th
९)मनस्वी 6th
१०)ऋषाली 9th
११)अनया 7th
१२)पायल 7th ईत्यादी….
या उपक्रमा अंतर्गत शुक्रवार दिनांक १२ मे २०१७ ला आदिवासी भागातील आमटी या गावातील शाळेत ,विद्यार्थ्यांना नवीन सत्रासाठी वह्या वाटप केल्यात. या कामात मुख्याध्यापक श्री पंढरीभाऊ कालोकार यांनी मदत केली.त्याचदिवशी संध्याकाळी सर्व प्रशिक्षणार्थी यांचे स्नेह संम्मेलन आयोजित करण्यात आले .सर्वानी या वर्गाबाबतचे आपले मत व्यक्त केले.
शनिवार दिनांक १३ मे २०१७ या वर्गाचा समारोप समारंभ झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच सौ.प्रियाताई बागडे उपस्थित होत्या . प्रमुख पाहुणे म्हणून श्री जोगी,जिल्हा परिषद सदस्य व ईतर मान्यवरांमध्ये श्री रोहण तुकदेव ,श्री योगराज उरमाले ,श्री प्रशांत उरमाले ,श्री रघुनाथ उरमाले उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
याच उपक्रमा अंतर्गत गावातील मुलांसाठी वाचनालय सुरु करण्यात आले.
हा सर्व उपक्रम वेद वासुदेव प्रतिष्ठान अंतर्गत वासुदेव सेवा संघातर्फे घेण्यात आला.
या सर्व उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहंदी या गावातील सर्वांचे सहकार्य लाभले.तसेच सौ व श्री रविंद्र दाणी,सौ व श्री हृषीकेश दाणी,सौ व श्री श्रीनीवास दाणी,श्री प्रतीक त्रिवाड,श्री उमेश चिवटे,श्री विश्वास सुपेकर,श्री सचीन खंडेलवाल,श्री नारायण धानोरकर,श्री मकरंद करकरे,कु.मैथीली पाटील,श्री अमोघ पंडे , चंद्रपुर परिवार व सर्वच जे या उपक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी झाल्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला.
“शिवभावे जीवसेवा” या आपल्या लक्ष्याकडे छोटीशी वाटचाल .स्वामींनी आपणा सर्वांकडुन हे कार्य असेच अविरतपणे करुन घ्यावे व आदरणीय अजितदादांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे हीच गुरुचरणी प्रार्थना.19025335_344223329328226_44787560422317284_o

19095664_344222969328262_4864334288880755657_o

19025322_344222832661609_4605208991520600871_o

19055201_344222785994947_5479032090369982042_o

19055724_344222702661622_4427858537298771178_o

19092909_344222655994960_6436058227289243997_o

19092974_344222619328297_2296877734484846418_o

19095498_344222502661642_1486973454661986117_o

19054909_344222285994997_7830416258127622213_o

19054973_344222242661668_1240941242009230055_o

Posted in Monologue

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

four × 2 =