Brahmavarta,Uttar Pradesh: P.P. Tembe Swami Maharaj’s Punyatithi Sohala on 24/06/2017

Recent Updates:24/06/2017 ब्रम्हावर्त
उत्तर प्रदेश मधील कानपूर या शहरापासून 25 km वर बिठूर हे गंगा मैय्याच्या किनाऱ्यावर वसलेले छोटेसे गाव आहे.अतिशय संथ वाहणारी गंगा मैय्या आणि गर्दी पासून दूर असणारे हे गाव आहे.नदी किनारी बरेच मंदिर आणि संन्यासी आश्रम आहेत. गंगेच्या किनारी संन्यासी पाहिजे तेवढे दिवस राहू शकतात,इतर ठिकाणी मात्र 3 दिवसाच्या वर एका ठिकाणी त्यांना राहता येत नाही. त्यामुळे गंगेच्या किनारी बरेच संन्यासी राहतात. बिठूर हे गाव अतिशय शांत आहे. धावपळीच्या,गर्दीच्या जीवनापासून बरेच दूर आहे. आपले सेनापती तात्या टोपे यांचे हे गाव. त्यांचे घर आणि वंशज अजूनही येथे आहेत. याच गावात ब्रम्हावर्त घाट आहे. ब्रम्ह घाट असेही म्हणतात. आख्यायिका अशी आहे की ब्रम्हदेवाने सृष्टीची संरचना या ठिकाणी बसून केली आहे.
अशा या घाटावर प प श्री टेंबे स्वामींनी 1892 साली चातुर्मास केला होता. आणि नंतर ओळीने 3 चातुर्मास 1902,1903,1904 या ठिकाणी केले. माणगाव नंतर एवढा प्रदीर्घ कालावधी श्रीस्वामीनी येथेच व्यतित केला आहे. ब्रम्हावर्त हे श्रीस्वामींचे अतिशय आवडते क्षेत्र आहे असे यावरून दिसून येते. श्रीस्वामींकडून याच ठिकाणी श्रीदत्त पुराणा ची निर्मिती झाली. आधुनिक कालावधीत रचलेले हे एकमेव पुराण आहे. तसेच दत्त संप्रदायाला मिळालेला अतिशय महान मंत्र *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा* हा सुद्धा श्रीस्वामींना येथेच स्फुरला आहे. यावरून या क्षेत्राचे महत्त्व आणि माहात्म्य लक्षात येते. श्रीदत्त संप्रदायातील प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदातरी या स्थानावर जाऊन दर्शन घेऊन पावन व्हावे असे हे क्षेत्र आहे. या स्थानावर श्रीस्वामींच्या कुटीचे सुशोभीकरण व विस्तारीकरण म्हणजेच जीर्णोद्धाराचे कार्य पुणे येथील वेद वासुदेव प्रतिष्ठान ही संस्था करत आहे. तसेच या संस्थे मार्फत भक्तांच्या सोयी साठी भक्तनिवास चे निर्माणही चालू झाले आहे. 24 जून रोजी श्री स्वामींच्या पुण्यतिथीच्या पावन योगावर
वेद वासुदेव प्रतिष्ठान,पुणे या संस्थेचे प्रमुख विश्वस्त प.पू.श्री अजितदादा तुकदेव व प.प.श्री शंकरानंद सरस्वती स्वामीमहाराज,दत्तात्रय पीठ,नारद घाट,काशी या द्वयीच्या हस्ते भक्त निवासचे आणि कुटी जीर्णोद्धाराचे भूमी पूजन संपन्न झाले आहे. येत्या 3/4 महिन्यात कुटी पूर्ण होईल आणि साधारण दीड वर्षात भक्त निवास पण पूर्णपणे सज्ज होईल. अधिकाधिक दत्तभक्तांनी या स्थानावर जाऊन भेट द्यावी हे आवाहन.

भक्तनिवास येथील भूमीपूजन-
IMG-20170628-WA0001

तेजोत्तारण विधी-

IMG-20170628-WA0002

श्रीदत्तपुराण पालखी-

IMG-20170628-WA0003

Posted in Monologue

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

sixteen + 19 =